अहमदाबाद विमानतळावर १३ कोटींचा गांजा जप्त

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
अहमदाबाद,
ahmedabad-cannabis-seizureअहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाने नुकताच १३.०१२ किलो उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला़ या गांजाचे बाजारमुल्य १३ काेटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे़ अधिकाऱ्यांनुसार, बँकॉकहून थाई एअरवेजच्या विमानाने अहमदाबाद विमानतळावर आलेल्या एक महिला व एक पुरुष अशा दाेन प्रवाशांना त्यांचे वर्तन आणि संशयास्पद हालचालीवरुन थांबवण्यात आले़ या प्रवाशांचे चेक-इन केलेले सामान एक्स-रे मशीनमधून स्कॅन केले असता स्क्रीनवर संशयास्पद आकार दिसले.
ahemdabad 
 
 
 
सखोल तपासणीदरम्यान, ट्रॉली बॅगमध्ये १४ पारदर्शक व्हॅक्यूम सीलबंद पॉलिथिन पाकिटे आढळली़ त्यात १३.०१२ किलो उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा असल्याचे तपासात समाेर आले़ त्याचे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ बाजारात अंदाजित मूल्य १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमली पदार्थ असल्याची खात्री झाल्यावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दोन्ही तस्करांना अटक केली़