'या' एका खेळाडूमुळे CSK ला 14.20 कोटींचा फायदा!

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई,
IPL 2027चेन्नई सुपर किंग्स आगामी मिनी ऑक्शनआधी आपल्या ताफ्यात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. आयपीएल ऑक्शनमध्ये प्रत्येकी 14.20 कोटी रुपयांची भलीमोठी बोली लावून संघात घेतलेल्या दोन युवा खेळाडूंपैकी एकाला सीएसके रिलीज करण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्सने मागील आयपीएल ऑक्शनमध्ये दोन खेळाडूंना प्रत्येकी 14.20 कोटी देऊन संघात घेतलं होतं. यामध्ये राजस्थानचा विकेटकीपर बॅटर कार्तिक शर्मा आणि उत्तर प्रदेशचा 20 वर्षीय ऑलराउंडर प्रशांत वीर यांच्या नावाचा समावेश आहे.
 

csk 
प्रशांत वीर सीएसकेने दिलेल्या किंमतीला साजेशी कामगिरी करू शकला नाही. प्रशांत वीरने 6 मॅचेसच्या 5 इनिंग्समध्ये केवळ 90 रन्स केले आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. आरसीबीविरुद्ध केलेली 43 रन्सची इनिंग ही त्याची या सीझनमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. दुसरीकडे, राजस्थानच्या 20 वर्षीय कार्तिक शर्माने या सीझनमध्ये तुलनेने उत्तम कामगिरी करून दाखवली. त्याने 11 मॅचेसमध्ये 32.77 च्या सरासरीने 295 रन्स केले होते. त्यामुळे सीएसके मॅनेजमेंट त्याला रिटेन ठेवण्याचा विचार करू शकते. मात्र, प्रशांत वीरचा पत्ता कट होणार हे निश्चित मानलं जातंय.
 
 
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, झहीर खानच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा सीएसके टिम प्रशांत वीरला पूर्णपणे सोडण्याच्या मनस्थितीत नाही. 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या ऑक्शनसाठी पर्समधील रक्कम वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे त्याला ऑक्शनमध्ये पुन्हा सीएसके बोली लावू शकते. सध्या चेन्नईचा पेटारा खाली आहे. सध्या सीएसकेकडे फक्त 2.4 कोटी रुपये शिल्लक आहेत. सॅलरी कॅपमध्ये वर्षाला होणाऱ्या 5 कोटींच्या वाढीमुळे त्यांची पर्स 7.4 कोटींपर्यंत पोहोचेल. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्ज 14.20 कोटीच्या रकमेसह 22 कोटींचा लिलाव घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जातीये.