बुलढाणा,
dadulgaon-rti-protestजळगाव जामोद तालुक्यातील गट ग्रामपंचायत दादुलगाव येथील माहिती अधिकार प्रकरण २०१६ पासूनचे अभिलेख दस्तऐवज गायब असल्याचे प्रकरण घरकुल लाभार्थ्यांवरील अन्याय संशयित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत तसेच मानेगाव ते बुलढाणा संविधान व हाती मशाल घेऊन धावणे आंदोलन दि. २ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद आवारात येऊन धडकले. तिव्र आंदोलन व घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. याप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी आ. संजय गायकवाड जिप मुकाअ भालचंद्र चव्हाण यांच्या कक्षात दाखल झाले. संबधित ग्रामसेवक कर्मचार्यावर कारवाईचे निर्देष दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
संकेत नरहरी गई व गावकर्यांनी जळगाव जामोद तालुक्यातील गट ग्रामपंचायत दादुलगाव येथील विविध समस्या, माहिती अधिकारातील अपूर्ण माहिती, ग्रामपंचायतीचे अभिलेख उपलब्ध नसणे, घरकुल लाभार्थ्यांवरील अन्याय तसेच संबंधित प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत आम्ही यापूर्वी अनेक वेळा गटविकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव जामोद तसेच जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे पत्रव्यवहार करून तसेच प्रत्यक्ष भेटून तक्रारी मांडल्या आहेत. मात्र आजपर्यंत या गंभीर प्रकरणावर ठोस व समाधानकारक कारवाई झालेली नाही. गट ग्रामपंचायत दादुलगाव येथे माहितीचा अधिकार अर्ज करण्यात आला होता. मात्र मागितलेली संपूर्ण माहिती आजपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे वारंवार पाठपुरावा करावा लागला असून, या प्रकरणी उपोषणाची भूमिकाही घ्यावी लागली. त्यावेळी उपोषण मागे घेण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडून आश्वासने देण्यात आली. परंतू कारवाई झाली नाही.
ग्रामपंचायत दादुलगावमधील सन २०१६ पासूनचे अभिलेख, घरकुल प्रकरणे, ग्रामपंचायत ठराव, शासकीय निधीचा वापर, विविध योजनांची अंमलबजावणी व इतर संबंधित बाबींची जिल्हास्तरीय स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. चौकशीत दोषी आढळणार्या ग्रामसेवक, संबंधित अधिकारी/कर्मचारी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच गैरव्यवहारामुळे शासनाचे अथवा गावाचे आर्थिक नुकसान झाले असल्यास संबंधितांकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी. आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्याने दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी आंदोलनकर्ते जिप आवारात ठिय्या आंदोलन देत असतांना ग्रामपंचायत विभागाचे उपमुकाअ शिवशंकर भारसाकळे यांनी चौकशी करण्याचे सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी त्यांचेवर सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला. आंदोलन तिव्र केले यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव उपस्थित होते. त्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी जिप मुकाअ भालचंद्र चव्हाण यांच्या कक्षात आंदोलन कर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर ठोस कारवाईच्या आश्वासनाने आंदोलक शांत झाले.