ऑक्टोबरचे जीएसटी संकलन २.३१ लाख कोटी

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
 
GST collection for October
 
 
 
नवी दिल्ली, 
GST collection for October देशांतर्गत व्यवहार आणि आयातीतून मिळालेल्या भक्कम महसुलामुळे ऑक्टोबर महिन्यात एकूण वस्तू व सेवा कर अर्थात् जीएसटी संकलनात २३ टक्क्यांनी वाढ होऊन ते २.३१ लाख कोटींच्या वर पोहोचल्याचे रविवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देशंतर्गत विक्रीतून मिळणारा एकूण जीएसटी महसूल १६ टक्क्यांनी वाढून १.५९ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचला आहे, तर आयातीतून मिळणारा महसूल ४२ टक्क्यांनी वाढून ७२,२४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २.३१ लाख कोटी रुपयांच्या संकलनामध्ये ४२,९३५ कोटी रुपयांचा केंद्रीय जीएसटी, ५१,३४० कोटी रुपयांचा राज्य जीएसटी आणि १.३७ लाख कोटी रुपयांहून अधिक एकात्मिक जीएसटीचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर परतावा वार्षिक आधारावर ६.५ टक्क्यांनी वाढून २७,९३४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. परताव्यांचे समायोजन केल्यानंतर, ऑक्टोबर महिन्यात निव्वळ जीएसटी संकलन २६ टक्क्यांनी वाढून २.०३ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे. एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत, एकूण जीएसटी संकलन १३.२ टक्क्यांनी वाढून १४.७७ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे. निव्वळ संकलनात १३ टक्क्यांची वाढ होऊन ते १२.६९ लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे.