टी-20 मालिका संपली, आता वनडेचे सामने रंगणार

विराट-रोहितकडे नजरा

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई,
india-vs-nz-odi-seriesभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका आता संपली असून, क्रिकेट चाहत्यांना आता वनडे मालिकेची उत्सुकता लागली आहे. या मालिकेत टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांच्या नजरा या दोन्ही स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर असतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची वनडे मालिका 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील अखेरचा सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना विराट आणि रोहितचा खेळ पाहण्यासाठी सकाळी लवकर टीव्हीसमोर बसावे लागणार आहे.
 
t-20
 
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामने किती वाजता सुरू होणार?
भारताचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमधील टी-20 मालिका नुकतीच पार पडली. टी-20 मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता सुरू होत होते. मात्र, वनडे मालिकेसाठी सामन्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 7:30 वाजता सुरू होतील. त्याआधी सकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. त्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी लवकर उठावे लागणार आहे.
भारताने टी-20 मालिका 3-2 ने जिंकली
न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 3-2 अशा फरकाने विजय मिळवला. मालिकेतील सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकत टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मात्र, न्यूझीलंडने शेवटच्या दोन सामन्यांत दमदार पुनरागमन करत भारताला पराभवाचा धक्का दिला. अखेर भारताने ही मालिका 3-2 ने आपल्या नावावर केली. आता टी-20 मालिकेतील विजयाची लय कायम राखत वनडे मालिकेतही बाजी मारण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.
विराट कोहली आणि रोहित शर्माकडे सर्वांचे लक्ष!
वनडे मालिकेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे मैदानावरील पुनरागमन. दोन्ही अनुभवी फलंदाजांकडून चाहत्यांना मोठ्या खेळींची अपेक्षा आहे. मागील वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही या दोघांनी आपल्या फलंदाजीची चमक दाखवली होती. आता न्यूझीलंडच्या गोलंदाजांविरुद्ध विराट आणि रोहित कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी वनडे मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना : 4 नोव्हेंबर, 2026 – भारत विरुद्ध न्यूझीलंड
दुसरा एकदिवसीय सामना : 7 नोव्हेंबर, 2026 – भारत विरुद्ध न्यूझीलंड
तिसरा एकदिवसीय सामना : 10 नोव्हेंबर, 2026 – भारत विरुद्ध न्यूझीलंड
चौथा एकदिवसीय : 13 नोव्हेंबर 2026 – भारत विरुद्ध न्यूझीलंड
पाचवा एकदिवसीय : 15 नोव्हेंबर 2026 – भारत विरुद्ध न्यूझीलंड