विरोधी पक्षनेत्यासह एका नगरसेवकाचे १५ दिवसांसाठी निलंबन

सभेचे चित्रीकरण केल्याप्रकरणी महापौरांची कारवाई

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
अकोला
municipal corporation महानगरपालिकेच्या सभेत पूर्वपरवानगी न घेता मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेता डॉ.जिशान हुसेन व काँग्रेसचे प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक फिरोज खान यांचे १५ दिवसांसाठी निलंबन करण्यात आले.सभेच्या अध्यक्ष तथा महापौर शारदा रणजीत खेडकर यांनी ही कारवाई केली.
 
 
akola
महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे मनपाच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवार, २ रोजी आयोजन करण्यात आले होते.दरम्यान विषय सूचीवरील शिवणी विमानतळाच्या संदर्भात विषय चर्चेला जात असताना त्यावर काँग्रेसच्या नगरसेविका निलोफर खान बोलत असताना यावेळी काँग्रेसचे नगरसेवक फिरोज खान हे आपल्या मोबाईलद्वारे चित्रीकरण करीत होते.दरम्यान महापौर यांनी चित्रीकरण करण्यासंदर्भात मज्जाव केला.त्याचवेळी डॉ जीशान हुसेन यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत आपल्या मोबाईल मध्ये सभेचे चित्रीकरण सुरू केले.याशिवाय कुठल्याही शासकीय कार्यालयात चित्रीकरण करण्याची मुभा असल्याचे ते यावेळी म्हणाले. मात्र खाजगी घरातून सभेचे चित्रीकरण न करण्याबाबत मनपाने या आधीच निर्णय घेतल्याचे विजय अग्रवाल यांनी सांगत चित्रीकरण करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.तरीही दोघांनीही चित्रीकरण सुरूच ठेवल्याने अखेर महापौर शारदा खेडकर यांनी दोन्ही नगरसेवकांना १५ दिवसांसाठी निलंबित करीत सभागृहाबाहेर जाण्याच्या सूचना केल्या.यावेळी काही काळ सभागृहात गोंधळ उडाला होता.