मुंबईच्या अल्पिन टॉवरमध्ये १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |

मुंबई,
mumbai-kandivali-incidentमुंबईच्या कांदिवली पूर्वमधील उच्चभ्रू परिसर मानल्या जाणाऱ्या ठाकूर व्हिलेज येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील 'अल्पिन टॉवर' या निवासी इमारतीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
mumbai suicide
 
 
उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केलं
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १:५३ वाजण्याच्या सुमारास अल्पिन टॉवरमधील रूम क्रमांक २८०४ मध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नातेवाईकांनी मुलीला तातडीने उपचारासाठी कांदिवली पश्चिमेकडील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून पहाटे २:२२ वाजता तिला मृत घोषित केले.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी शवागृहात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.