पोलिस आयुक्तांचा फोटो वापरुन डिजीटल अरेस्ट

१ कोटी ४ लाख रुपयांचा घातला गंडा : दोन आरोपींना अटक

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
digital arrest शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा फोटोचा गैरवापर करुन त्यांच्या आवाजाची नक्कल करीत एका जेष्ठ नागरिकाला डिजीटल अरेस्ट केली. त्या ज्येष्ठ नागरिकाला १ कोटी ४ लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. दिनेश अवाभाई रावरीया (३२) व अरविंद कानजी गाला (४५) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
 

nagpur digital arrest scam fraudsters misuse police commissioner’s photo, cheat senior citizen of rs 1.04 crore 
दीनदयाळ नगरातील प्रविरकुमार तालुकदार यांना काही दिवसांपूर्वीच एक फोन आला. फोन करणाऱ्याने प्रविरकुमार यांना आपण पोलिस आयुक्त असल्याचे सांगितले. दरम्यान त्याने एनआयएचे अधिकारी प्रदीप जैस्वाल बोलणार असल्याचे सांगून भीती दाखवली. या दोन आरोपींनी चक्क पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि प्रदीप जयस्वाल यांच्या फोटोचा गैरवापर केला होता. प्रविरकुमार यांना पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो वापरून व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटली अरेस्ट’ ठेवले. त्यानंतर एनआयएचे प्रदीप जैयस्वाल यांच्या नावे भीती घालून आरोपींनी १ कोटी ४ लाख रुपये आरटीजीएस द्वारे पाठवण्यास भाग पाडले. अखेर या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली.