२०२७ मध्ये तीन राशींना शनिच्या संक्रमणाचा फटका?

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
Saturn’s blow to three zodiac signs वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्मफळदाता मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारे शनी ग्रह राशी परिवर्तन करतात, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडत असल्याची ज्योतिषीय मान्यता आहे. द्रिक पंचांगानुसार, ३ जून २०२७ रोजी शनी मेष राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात मेष ही शनीची नीच राशी मानली जाते. त्यामुळे या संक्रमणाच्या काळात काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असा ज्योतिषीय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः मेष, वृषभ आणि कन्या या तीन राशींनी या काळात अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
 
 
 
satun
 
मेष राशीमध्येच शनीचे संक्रमण होणार असल्याने या राशीच्या व्यक्तींवर साडेसातीचा प्रभाव राहणार असल्याचे सांगितले जाते. या काळात मनाची अस्वस्थता वाढण्याची आणि काही कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण न होण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे आणि कामाच्या ठिकाणी संयमाने निर्णय घेणे आवश्यक ठरेल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा प्रवेश बाराव्या स्थानात होणार असून, साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. परिणामी, खर्चात वाढ होऊन आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. कोणाशीही पैशांचे व्यवहार करताना काळजी घेण्याचा तसेच न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
 
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे संक्रमण आठव्या स्थानात होणार असल्याने या काळाचा संबंध शनीच्या ढैय्याशी जोडला जातो. नोकरी आणि व्यवसायात अडथळे निर्माण होण्याची, एखादे काम पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आणि महत्त्वाचे निर्णय घाईघाईने न घेणे हिताचे ठरेल, असे ज्योतिषीय भाकीत आहे. तसेच, गुंतवणुकीपूर्वी योग्य माहिती घेण्याचा सल्लाही या राशीच्या व्यक्तींना देण्यात आला आहे.