वाशीम,
diwali दिवाळीचा आनंद फटायांच्या आतषबाजीत नव्हे, तर निसर्गाच्या सान्निध्यात आणि पर्यावरणाच्या संरक्षणात आहे, हा संदेश देत राष्ट्रीय हरित सेना, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, वाशीमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची शपथ घेत समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवला.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण असला, तरी फटायांच्या अतिवापरामुळे मोठ्या प्रमाणात वायू व ध्वनिप्रदूषण निर्माण होते. फटायांमधून बाहेर पडणारे विषारी घटक मानवी आरोग्यासाठी घातक ठरतात. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच पशुपक्ष्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. फटायांच्या निर्मितीमध्ये बालकामगारांचे होणारे शोषण आणि फटाके फोडताना घडणारे अपघात याविषयीही विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यात आली.या पार्श्वभूमीवर प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक तथा मास्टर ट्रेनर अभिजीत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ घेतली. फटायांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून मिठाई, फराळ, आवडीची पुस्तके, किल्ले, आकर्षक रांगोळ्या, आकाशकंदील आणि भेटवस्तूंच्या माध्यमातून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले.
फटाके नकोत, प्रदूषण नको; हवीdiwali आनंदाची आणि प्रकाशाची दिवाळी ! असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश या चिमुकल्यांनी समाजाला दिला. केवळ शपथ न घेता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षणाचा आदर्श निर्माण करणारा राष्ट्रीय हरित सेनेचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक तथा मास्टर ट्रेनर अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले. हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी उत्स्फूर्त सहकार्य केले.