सोनेगाव (आ.) येथे कापसाच्या गंजीला आग; ३० क्विंटल कापसाची राख

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
देवळी,
fire-breaks-out-in-cotton-field-at-sonegaon तालुक्यातील सोनेगाव (आ.) येथे मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास शेतकरी निखिल वानखेडे यांच्या गोठ्यातील खोलीत साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला भीषण आग लागली. या घटनेत ३० क्विंटल कापूस जळून खाक झाला. या खोलीमध्ये ५० ि़कवंटर कापूस ठेऊन होता. आगीवल लवकर नियंत्रण मिळवल्याने २० क्विंटल कापूस वाचला. अग्निशमन दल, पोलिस आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून आग आटोक्यात आणण्यात आली.
 
 
sonegaon
 
यावर्षी जवळपास सर्वच पिकांचे उत्पन्न कमी झाले. त्यातल्या त्यात चालू हंगामात निघालेला कापूस शेतकरी वानखेडे यांनी शेतातील गोठ्यात असलेल्या खोलीत गंजी लावून ठेवला होता. रात्री अचानक खोलीतून धूर निघत असल्याचे दिसुन आल्याने गावकर्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, देवळी नगर पालिकेच्या अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. आग्निशमन दलाचा बंब आणि गावकर्यांच्या मदतीने रात्री २ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शेतात कष्ट करून पिकवलेला आणि मेहनतीची कमाई असलेला कापूस डोळ्यांदेखत आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना पाहून शेतकरी निखिल वानखेडे यांना अशू अनावर झाले.
 
मध्यरात्रीपासून सुमारे दोन वाजेपर्यंत सुरू असलेल्या मदतकार्यात अग्निशमन विभागाचे रणजित दाभेकर, आसिफ शेख व अक्षय क्षीरसागर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी देवळी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला तातडीने घटनास्थळी रवाना होण्याच्या सूचना स्वतः देत घटना धाव घेतली. देवळीचे ठाणेदार संदीप कापडे हे पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिस, ग्रामस्थ तसेच युवा संघर्ष मोर्चाच्या कार्यकत्र्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.