भारत-पाकिस्तान ‘अ’ संघांत महामुकाबला!

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
great-match-between-india-pakistan-a-teams एशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेला सुरुवात झाली असून, यंदा आठ संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरले आहेत. या स्पर्धेत भारताचा ‘अ’ संघ सहभागी झाला असून, तिलक वर्माकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर रिंकू सिंग उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्याची संधी लवकरच मिळणार आहे.
 
india-pakistan
 
भारताचा ‘अ’ संघ आज नेपाळविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी भारतीय संघाचा सामना पाकिस्तानच्या ‘अ’ संघाशी होईल. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताकडून ‘अ’ संघ खेळत असला, तरी नेपाळने आपला मुख्य संघ उतरवला आहे. ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात होत असून, प्रत्येक सामना ५० षटकांचा असणार आहे.
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा बहुप्रतीक्षित सामना दोहा येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यापूर्वी दुपारी ३ वाजता नाणेफेक होणार आहे. ५० षटकांचा सामना असल्याने रात्री १०.३० वाजेपर्यंत खेळ संपण्याची शक्यता आहे.
 
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक लढत झाली होती. अखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर एका गडी राखून विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांचे संघ आमनेसामने येणार असल्याने या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
 
भारत ‘अ’ संघ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, रिंकू सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव, तनुष कोटियान, हर्ष अरशम खान आणि हर्ष दुबे. पाकिस्तान ‘अ’ संघ : शाहजेब खान, हैदर अली, अब्दुल समद (कर्णधार), हसन नवाज, माझ सदाकत, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), दानिश अझीझ, मोहम्मद इम्रान रंधावा, मोहम्मद हसनैन, अहमद दानियाल, सुफयान मोकीम, अली रझा, साद मसूद, शमिल हुसैन आणि फरहान यू.