एसटी प्रवासात मिळणार 50 टक्के सूट

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
पंढरपूर,
pandharpur-kartiki-yatra-busesपंढरपूर येथे 21 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळ आता सज्ज झालेलं आहे. राज्यभरातून पंढरपूरला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी यंदा सुमारे 1 हजार जादा बसेस या सोडण्यात येणार आहेत.
 
pandharpur
 
 
वारीसाठी एसटी महामंडळाची जय्यत तयारी
विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरात दाखल होत असतात. त्यांची गौरसोय होऊ नये म्हणून एसटीने आता जय्यात तयारी केली आहे. दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी देखील विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे. चंद्रभागा या बसस्थानकातून गावोगावी जाण्यासाठी जादा फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक भाविकांना परतताना ताटकळत बसावं लागणार नाही.
 
ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. 75 वर्षांवरील असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास हा पूर्णपणे मोफत असणार आहे. तर 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत मिळणार आहे. भाविकांनी खासजगी वाहनांनी गर्दी करण्यापेक्षा एसटीच्या सुरक्षित आणि स्वस्त प्रवासाचा लाभ घ्यावा, असं आवाहन हे परिवहन मंत्री मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.