‘मुनघाटे’च्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
कुरखेडा,
munghate college दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मुनघाटे महाविद्यालयाच्या चार खेळाडूंची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राजस्थान येथील माधव विद्यापीठ येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बाल बॅडमिंटन स्पर्धेकरिता निवडलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या मुलांच्या संघात श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या लोचन झोडे, अशपाक शेख, आदित्य साखरे व आदित्य लांजेवार या विद्यार्थांची निवड करण्यात झालेली आहे.
 
 
munghate college
 
 
यापूर्वीही या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी राज्य व देशातील विविध विद्यापीठात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत यश संपादन केलेले होते. मुनघाटे महाविद्यालयाचा शारीरिक शिक्षण विभाग हा अतिशय उपक्रमशील व कर्तबगार असून महाविद्यालयाचे दीडशेहून अधिक विद्यार्थी कलर होल्डर ठरलेली आहेत. या विद्यार्थ्यांना यामुळे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध झालेल्या असून विविध क्षेत्रात हे कलर होल्डर विद्यार्थी कार्यरत आहेत. यावर्षी सुद्धा ऑल इंडिया आंतर युनिव्हर्सिटी मध्ये बाल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, महाविद्यालयाचे प्रभारी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. प्रमेश दाणी, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेले आहे.