हिंगणघाट,
sex racket in hinganghat शहरातील नंदोरी रोडवरील पंढरीनगरी परिसरात भाड्याच्या घरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या कथित देह व्यापाराचा हिंगणघाट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन महिलांना अटक करण्यात आली असून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदोरी रोड परिसरातील पंढरीनगरी येथे एका भाड्याच्या घरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी खबर्यामार्फत परिस्थितीची पडताळणी केली. माहितीची खात्री झाल्यानंतर ठाणेदार अनिल राऊत यांनी पोलिस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून दोन महिलांना ताब्यात घेऊन अटक केली. तसेच रोख रक्कम, मोबाईल फोन आणि कथित अनैतिक व्यवसायाशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.sex racket in hinganghat त्या भाड्याच्या घरात गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर येत असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई ठाणेदार अनिल राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पोलिस पथकात डी. बी. पथकाचे जमादार प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, मंगेश वाघमारे, किशोर कडू, विजय हरनुल, अपर्णा डोंगरे, सीमा लोखंडे यांचा सहभाग होता.