मुंबई
ramayana-box-office-collectionरणबीर कपूर , साई पल्लवी आणि यश यांची मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण पार्ट १' या पौराणिक चित्रपटानं चित्रपटगृहांमध्ये आपले १५ दिवस पूर्ण केले आहेत. प्रदर्शनाच्या १५ व्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी चित्रपटानं भारतात १९.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. दैनंदिन कमाईत काहीशी घट झाली असली, तरी या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई आता १,५४७.१५ कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे.
गुरुवारी देशभरात या चित्रपटाचे सर्व भाषांमध्ये मिळून २१,४३७ शो पार पडले आणि अंदाजे ९,२८,१८८ तिकिटांची विक्री झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत गुरुवारी कमाईत १६.६ टक्क्यांची घट नोंदवली गेली.
हिंदीत सिनेमानं १७,४२८ शो च्या माध्यमातून १४ कोटी रुपये कमावले. तर मल्याळम सिनेमानं ९३७ शोतून १.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला .तमिळ सिनेमाचे १,१५८ शोज होते. यातून सिनेमानं १.५० कोटी रुपये कमावले. तर कन्नड सिनेमांचेही ८८४ शोज होते, यातून १ कोटी ४० लाखांची कमाई झाली. तेलुगु आवृत्तीची कमाई ही ७० लाख आहे.
पहिल्या आठ दिवसांत 'रामायण'नं भारतात ५६४.६० कोटी रुपये निव्वळ आणि ६७५.०५ कोटी रुपये ग्रॉस कमाई केली होती. त्यानंतरच्या सात दिवसांत चित्रपटानं २९९.१५ कोटी रुपये निव्वळ आणि ३५७.१० कोटी रुपये ग्रॉस गल्ला जमवला. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्याच्या निव्वळ कमाईत ४७ टक्क्यांची घट झाली आहे.