‘मराठी सिनेमात नवी उमेद.....काय म्हणाल्या शर्वरी वाघ

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |

मुंबई,
sharvari-waghचेहऱ्यावर सहज भाव, भूमिकेनुसार बदलणारी देहबोली आणि व्यक्तिरेखेच्या बारकाव्यांकडे लक्ष देणं ही शर्वरी वाघ हिच्या अभिनयाची ठळक वैशिष्ट्यं. 'यह प्रेम मोल लिया' या चित्रपटाच्या निमित्तानं तिनं 'मुंटा'शी संवाद साधला. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका कलाकारासाठी महत्त्वाच्या असल्याचं तिनं यावेळी नमूद केलं. 'वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांचा अभ्यास करताना कलाकार विविध लोकांना, संस्कृतींना जाणून घेतो. त्यातूनच तो कलाकार घडतो', असं ती सांगते.
 

sharvari 
यह प्रेम मोल लिया ' हा चित्रपट आणि त्यातील तुझी भूमिका याविषयी काय सांगशील?
हा चित्रपट म्हणजे सांगीतिक कौटुंबिक नाट्य आणि प्रेमकथा यांचा उत्तम मिलाफ आहे. भारतीय प्रेक्षकांना बॉलिवूड चित्रपटात जे अपेक्षित असतं, ते सगळं यात आहे. तरीही हा चित्रपट वेगळा ठरतो तो त्यातील काही द्विस्टमुळे. कौटुंबिक नाट्य असलेल्या या सिनेमात आजच्या काळातील भाषा आहे. मुलगी लग्न होऊन सासरी जाण्याऐवजी काही कारणांमुळे मुलगा आणि त्याचं कुटुंब मुलीच्या घरी राहायला येतात आणि पुढे चित्रपटाची कथा उलगडत जाते. यात मी पूर्वा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ती एक पत्रकार, आधुनिक विचारांची, बोल्ड आहे, पण तितकीच भावनिक आणि हळवीही आहे.
'यह प्रेम....' या सिनेमामुळे अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करता आलं. त्यांना जवळून बघता आलं. अनुपम खेर, सुप्रिया पाठक, सीमा पाहवा, स्वानंद किरकिरे आणि इतर कलाकारांसोबत वावरताना बरंच काही शिकता आलं. प्रत्येक प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, बारकावे आणि ऊर्जा अशा खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.