वर्धा,
hindi university महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात डाव्या विचाराच्या विद्याथ्र्यांचा कायम उपद्रवर सुरू राहत आला आहे. या विद्यापीठातील सहा विद्याथ्र्यांना निलंबित करण्याची कारवाई विद्यापीठ प्रशासनाने केली होती. त्यानंतर आंदोलनांची मालिका सुरू असताना पुन्हा कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.
पीएचडी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, स्त्री व फिल्म अध्ययन विभाग पुन्हा वर्धा परिसरात सुरू करणे आणि स्वच्छ पाणी, मेस, कॅन्टीन यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी ८ जुलैपासून विद्याथ्र्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, विद्याथ्र्यांनी कुलगुरू दालनात असताना संपूर्ण परिसर कुलूप बंद करून कुलगुरूंसह अनेक अधिकार्यांना कोंडले होते. याप्रकरणी रामनगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी विद्यापीठात पोहोचून आत कोंडलेल्या अधिकार्यांना बाहेर काढले होते. त्याहीनंतर या विद्याथ्र्यांचे आंदोलन सुरूच आहे. २५ नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत असतानाही प्रशासनाने या विद्याथ्र्यांच्या भवितव्याबाबत अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप करून विद्याथ्र्यांनी पुतळा जाळला. प्रशासनाने १ सप्टेंबरपासून राजेश कुमार यादव, रामचंद्र, निरंजन कुमार, शिवपूजन पासी, राकेश अहिरवार आणि राहुल कुमार या सहा विद्याथ्र्यांवर परिसर व वसतिगृहात प्रवेश बंदी घातली आहे.