अनिल कांबळे
नागपूर,
monetary dispute पैशाच्या वादातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करीत त्याचा खून केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. शुभम लक्ष्मण कारेमोरे (३०) रा. एसआरए कॉलनी, उप्पलवाडी असे मृतकाचे नाव असून श्रवण नरेश गणवीर (२१) अलंकारनगर, बेसा चौक आणि सुधांशू राकेश पाटील (२४) लाँगमार्च चौक, इमामवाडा अशी मारेकर्यांची नावे आहेत.
शुभम कारेमोरे हा जॉब प्लेसमेंट, वीमा आणि आरटीओची कामे ऑनलाईन करतो. शुभमचे दिघोरी नाका चौकात कार्यालय आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने काही लोकांकडून पैसे घेतले होते. काही दिवसांपूर्वी त्याने एका तरुणीकडूनही नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ३० हजार रुपये घेतले होते. मात्र, नोकरी न लागल्याने आणि पैसेही परत न मिळाल्याने तरुणीने ही माहिती तिच्या मानलेल्या भावाला दिली.
१७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास संबंधित तरुणी, तिची मैत्रीण, सचिन हाडके, शुधांशू, श्रवण, नकुल, व त्याचे साथीदार हे कारने शुभमच्या कार्यालयात आले. त्यावेळी शुभमसोबत त्याचा मित्र रोशन अरूण कापसे (२६) रा. संत जगनाडेनगर, तुमसर (जि. भंडारा) हा देखील होता. आरोपींनी शुभम आणि रोशन यांना कारमध्ये बसवून दिज्ञोरी मार्गावरील डीजी लोन कार्यालय, माऊली डेअरीमागे नेले. रोशन आणि शुभम यांना कार्यालयात ओढून हातबुक्कीने आणि चामडी पट्टयाने मारहाण केली. त्याच्याजवळील फोन आणि गाडीची चावी हिसकावून घेतली.monetary dispute आरोपींनी रोशन यास ३० हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे शुभमच्या आईवडिलांना फोन करून पैसे न मिळाल्यास शुभमला जिवे मारण्याची धमकी दिली.