दोन लाखावरील रक्कम भरून समझोता कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा

पहिल्या टप्प्यात अडीच हजाराहून अधिक शेतकर्‍यांचा समावेश

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
वाशीम,
ahilyadevi-holkar-farm-loan-waiver-scheme पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत एकवेळ समझोता योजनेची पहिली यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत वाशीम जिल्ह्यातील ६४८ गावामधील २ हजार ५६७ पात्र शेतकर्‍यांचा समावेश आहे. संबंधित शेतकर्‍यांनी दोन लाख रुपयावरील कर्जाची रक्कम भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
ahilyadevi-holkar-farm-loan-waiver-scheme
 
पात्र शेतकर्‍यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी यादीतील तपशील तपासून आपल्या कर्जातील दोन लाख रुपयावरील हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकर्‍यांना कोणत्याही एका कर्जखात्यात ही रक्कम भरण्याची सुविधा आहे. मात्र, संबंधित खात्यात एकवेळ समझोत्यानुसार निश्चित केलेल्या देय रकमेपेक्षा जास्त रक्कम भरू नये. ही रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७ आहे.
 
 
तालुकानिहाय पात्र लाभार्थ्यांमध्ये वाशीम तालुयातील ७६९, रिसोड ४५७, मालेगाव २५९, मंगरुळनाथ २७८, कारंजा ५४७ आणि मानोरा तालुयातील २५७ शेतकर्‍यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांचा संबंध जिल्ह्यातील ६४८ गावांमधील सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) तसेच राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि खासगी बँकांशी आहे. शेतकर्‍यांनी हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर संबंधित बँकांकडून दर शुक्रवारी त्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. कर्जाची थकबाकी अद्ययावत झाल्यानंतर तीन दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल. अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण असलेल्या शेतकर्‍यांनाच आधार प्रमाणीकरण करता येणार असून, त्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्ती लाभ दिला जाणार आहे.
 
 
एकवेळ समझोता योजनेची ही पहिली यादी असून, बँकांकडील माहितीचे संगणकीय संस्करण पूर्ण झाल्यानंतर पुढील याद्याही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मयत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणार्‍या लाभार्थ्यांसाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या मानक कार्यप्रणालीनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे.