आर्वी,
arvi-municipal-council-administration नगर परिषद प्रशासनाकडे कोणत्याही विषयाची माहिती मागितली असल्यास माहिती मिळण्यास वारंवार दिरंगाई केली जात आहे. या प्रकराच्या विरोधात साखळी उपोषणाला परवानगी देण्यात यावी या मागणीचे निवेदन नगर परिषदेतील विरोधी पक्ष गटनेता व विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनामध्ये, मागील अनेक दिवसांपासून नगर परिषदेच्या वेगवेगळ्या विभागातुन ज्या विषयाबद्दल माहिती मागीतली असता उत्तर दिल्या जात नाही किंवा निवेदनावर/तक्रारीवर कारवाई करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे नाईलाजाने आम्ही साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबीण्याचे ठरविले असल्याची माहिती विरोधी पक्ष गटनेता यांनी दिली.
आपण नगरपरिषद अंतर्गत मोक्षधाम (रोटरी स्मशानभूमी) येथील भंगार नगरपरिषदेची परवानगी न घेता विकल्याची माहिती मागण्यात आली होती. नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने यांच्या नावाने असलेल्या नेहरू मार्केटमधील दुकानात जास्तीचे अतिक्रमण करून अवैध बांधकाम केल्याबद्दल माहिती, गांधी चौक येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुतळ्यासमोरील जागेच्या सौंदर्याकरणास विलंब होत असल्याबद्दल, इंदिरा चौक भूमी अभिलेख कार्यालय समोरील जागेचे मूळ क्षेत्रफळ ६०० चौरस फूट असून प्रत्यक्ष बांधकाम २८७५ चौरस फूट असून नगरपरिषदेची परवानगी न घेता अवैध बांधकाम असल्याबद्दल, नप सभागृहामध्ये तसेच अध्यक्षांचे कार्यालयात नगरपरिषद अंतर्गत येणार्या वार्डातील मेनरोड वरील झाडांची कटाई करण्यासंदर्भात न.प.ने काढलेल्या निविदेबाबत माहिती मिळण्याबाबत, शव शितपेटी तसेच शववाहन नगर परिषदेच्या वतीने सोय उपलब्ध करण्याबाबत व अंत्यसंस्काराकरिता अत्यंत गरीब कुटुंबाला आर्थिक मदतीबाबत, नपचे आम सभेचे व्हीडीओ रेकॉर्डीग करण्याबाबत, प्रभाग १२ मध्ये अंगणवाडी ते मरीमाता मंदिरापर्यंत रोड बनविण्याकरिता मध्यरेल्वे विभाग नागपूर यांचेशी पत्रव्यवहार करून परवानगी मिळविण्याबाबत. आदी विषयांची वारंवार माहिती मिळण्यास अती विलंब होत असल्याकारणाने नगर परिषद आर्वी प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण करण्याची परवानगी मिळण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.