तब्बल दोन दिवसानंतरही पावने चार कोटींच्या लुटीचा सुगावा नाही

- मध्यप्रदेशात पथकांची भटकंती

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
robbery case तीन ते चार सशस्त्र दरोडेखोरांनी घराच्या प्रवेशद्वारावरच पावणे चार कोटी रुपयांची रोकड लुटून नेली. या घटनेला तब्बल दोन दिवसांचा अवधी उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांची पथके मध्यप्रदेशात आरोपींच्या शोधासाठी भटकंती करीत आहेत. मात्र, पोलिसांना आरोपीचा कोणताही सुगावा लागला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 

robbery case 
 
 
नागपूर शहराला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे आहेत. त्यामुळे कोणताही गुन्हा घडला की, प्रथम सीसीटीव्ही बघून आरोपींबाबत माहिती घेण्याचे काम सुरु होते. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटविणे, त्यांच्या हालचालींचा माग काढणे आणि गुन्ह्याची उकल करण्यात येते. पण तंत्रज्ञानावरची हीच भिस्त आता पोलिसांच्या तपासाची मर्यादा ठरत आहे काय, असा प्रश्न तुलसीनगरमधील घटनेने ऐरणीवर आणला आहे. मंगळवारी मध्यरात्री उशिरा वाहनचालक मोहन राव हा कारमधून पावणे चार कोटींची रोकड घेऊन जालनासाठी रवाना होणार होता. तुलसीनगर परिसरात घराजवळच असताना तीन ते चार अज्ञात लुटारूंनी दुसऱ्या कारने त्याचा पाठलाग करीत चालकाला चाकूचा धाक दाखवून रोकड असलेली कार घेऊन पळ काढला.robbery case कारमध्ये ठेवलेल्या बॅगेत ३ कोटी ७४ लाख रुपयांची रोकड होती. लुटीनंतर आरोपी नागपूर जिल्ह्यातील कामठी-खैरी परिसरात पोहोचले. तेथे त्यांनी कार सोडून दिली. या घटनेला दोन दिवस झाले तरी कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही.
गुन्हे शाखेची पथकांची परीक्षा
मुंबई पोलिसांशी तुलना होत असलेल्या नागपूर गुन्हे शाखेची या गुन्ह्यातील उकल करणे ही मोठी परीक्षा ठरणार आहे. घरफोडी पथक, वाहनचोरी पथक आणि युनीटची पथके कार्यरत असतानाही अद्याप या लुटीचा छडा लावता आला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पथके फक्त वसुलीसाठीच काम करतात का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.