गेल्या 48 तासांत सोन्याच्या दारात 7 हजारांची घसरण!

चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |

gold-silver-prices-fall-sharplyसोने चांदी दरात घसरणीचा उतरता आलेख कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची तर दोन दिवसात एकूण सात हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.चांदीच्या दरात देखील चोवीस तासात एक हजार रुपयांची तर दोन दिवसात दहा हजार रूपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीत वधारलेले डॉलर आणि अमेरिकन फेडरल बँकाच्या व्याज दरात वाढ होण्याचे संकेत, याचा सोने चांदी दरात घसरण झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे.
 

gold price 
दोन दिवसापूर्वी सोन्याचे 130000 रुपये असलेले दर आज 123000 वर खाली आले आहेत, तर चांदीच्या 164000 रुपये असलेले दर आज 154000 वर खाली आले आहेत. सध्या जागतिक आर्थिक परिस्थिती पाहता अजूनही दर खाली जाण्याचा अंदाज असला तरी जानेवारी नंतर मात्र पुन्हा सोने चांदी दरात वाढ होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
सुवर्ण व्यासायिक सागर भंगाळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, मागील दोन दिवसांमध्ये जवळपास सोन्यामध्ये 7 हजार रुपयाची आणि चांदीमध्ये 10 हजार रुपये घसरण झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी जर सोन्याचा भाव होता 1 लाख 30 हजार रुपये होता, आणि आज जवळपास 1 लाख 23 हजार 500 आहे, आणि चांदीचा 1.64 होता, आज 1.54 आहे. याचं मुख्य कारण म्हणजे डॉलर ऑल टाईम हाय आहे, डॉलर खूप वाढलेला आहे, आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये गव्हर्मेंटची, यूएस गव्हर्मेंटची मीटिंग आहे, तिच्यामध्ये ते रेट हाय करण्याची शक्यता आहे. त्या एक्सपेक्टेशनमुळे सोनं आणि चांदीमध्ये मंदी आलेली आहे आणि दुसरं कारण म्हणजे जे गव्हर्मेंट बॉण्ड्स आहेत, त्याच्यावरती ऑल टाईम हाय 5% रेट ऑफ इंटरेस्ट भेटतोय, जो मागच्या काळामध्ये 3 ते 4% होता, ते पण ऑल टाईम हाय रेट, इंटरेस्ट रेट, त्याच्यामुळे कमी झालेले आहेत. भाव वाढतील की आणखी कमी होतील हे पुढचं काय सांगता येत नाही. जर का असंच राहिलं, शॉर्ट टर्ममध्ये कमी होण्याचे चान्सेस आहेत दर कमी होण्याचे, पण लॉंग टर्ममध्ये 100% रेट वाढतील.
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ही, सोनं ऑल टाईम लो झालेलं आहे वर्षभराच्या तुलनेमध्ये, जवळपास 1 लाखाहून आज सोनं जवळपास 1 लाख 23 वरती आलेलं आहे, चांदी पण ऑल टाईम लो आहे. ग्राहकांसाठी मला असं वाटतं सुवर्णसंधी आहे, याचा पूर्ण लाभ घ्यावा ग्राहकांनी. आता व्यापाराचं नुकसान होतंच आहे, पण तो बिझनेसचा पार्ट आहे,त्याचं काय करू शकत नाही, पण रिकव्हरी होईल मला असं वाटतं सोन्याच्या आणि चांदीच्या दोघांची दराची. मला वाटतं की जानेवारीपासून पुन्हा सोन्या चांदीच्या दरात तेजी येईल,असंही सागर भंगाळे यांनी म्हटलंय.