मोफत रेशनिंगचा सर्वात मोठा स्कॅम!

200 मृतांच्या नावावर लुटले रेशन

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
गोंदिया,
gondia-ration-scamराज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. दुष्काळाच्या झळा बसत असताना सरकारकडून मिळणाऱ्या स्वस्त रेशनिंगने गोरगरीब जनतेला मदत होते, पोटापाण्याच्या सोईसाठी हातभार लागतो. मात्र या रेशनिंग पुरवठ्यामध्येही अनेक गैरप्रकार होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. असाच धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यामधून समोर आला आहे. गोंदियामध्ये 200 मृतांच्या नावावर रेशन उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 

reshan scam 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिवंत व्यक्तींच्या हक्काचे रेशन मिळविण्यासाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागत असताना जिल्ह्यात मात्र तब्बल सात हजार 200 मृत व्यक्तींच्या नावावर रेशनची उचल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकांच्या पडताळणीसाठी राबविण्यात आलेल्या ‘मिशन सुधार’ मध्ये ही बाब उघड झाली.
मृत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी आणि चुकीचे आधार क्रमांक अशा विविध त्रुटी आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण 10 हजार 894 नावे शिधापत्रिकांमधून कमी करण्यात आली आहेत. ‘मिशन सुधार’मुळे अशा अनियमित नोंदी हटविण्यास मदत झाली असून, पात्र लाभार्थ्यांनाच शासकीय धान्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मृतांच्या नावावर किती काळ आणि किती प्रमाणात धान्याची उचल झाली? हे मात्र कोडेच आहे.
एकीकडे राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत आहे. गरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. अशातच गरिबांच्या हक्काच्या रेशनिंगवर डल्ला मारला जात असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.