कर्जाच्या वसुलीसाठी घरातील साहित्य बाहेर काढून घराला ठोकले सील!

आ. परिणय फुके आक्रमक, रात्रीच कार्यकर्त्यांना पाठवून दिला धीर, मनमानीविरोधात आ. फुके मैदानात

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
तुमसर,
mla parinay phuke कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून सितारा हौसिंग फायनान्स कंपनीने तालुक्यातील वाहणी येथील विष्णू कनपटे यांच्या घरातील साहित्य बाहेर काढून घराला सील ठोकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे संबंधित कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, ऐन रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर आली. या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. परिणय फुके यांनी आक्रमक भूमिका घेत तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. रात्रीच आपल्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठविले. कार्यकर्त्यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. संकटाच्या काळात आपण एकटे नसून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा धीर देत कुटुंबाला मानसिक आधार दिला.
 

mla parinay phuke 
 
 
राज्यात दुष्काळाचे सावट आहे. कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करू नका, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. या निर्देशांचे पालन सगळ्यांनी करणे गरजेचे आहे. खाजगी हाऊसिंग आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांची अडवणूक केल्याचे प्रकार पुढे येत आहेत. विष्णू कनपटे यांच्या पत्नी शांता यांच्या नावाने घर बांधकामासाठी सितारा हाऊसिंग फायनान्स या खाजगी कंपनीकडून कर्ज घेतले होते. दरम्यान मधल्या काळात कुटुंबातील एका कमावत्या सदस्याचा मृत्यू झाल्याने कर्जाचे हप्ते थकले. दुष्काळ आणि अडचणीची स्थिती असल्याने कर्ज भरणे शक्य झाले नाही. दरम्यान 20 नोव्हेंबर रोजी फायनान्स कंपनीचे अधिकाऱ्यांनी येऊन कनपटे यांच्या घरातील सामान बाहेर टाकून घराच्या दोन्ही दरांना कुलूप लावून ते सील केले. नोटीस चिपकवून सील तोडल्यास कारवाई करण्याची तंबी देण्यात आली. ही घटना कळताच इतर काही लोकप्रतिनिधींनी याचा निषेध करीत कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली.
या घटनेची माहिती मिळताच आमदार परिणय फुके प्रचंड आक्रमक झाले. कर्जाची परतफेड करणे ही कर्जदाराची जबाबदारी असली, तरी वसुलीच्या प्रक्रियेत मानवी संवेदनशीलता आणि कायदेशीर नियमांचे पालन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना आणखी संकटात ढकलण्याऐवजी त्यांना दिलासा देण्याची गरज आहे, अशी भूमिका घेत त्यांनी आधी कनपटे कुटुंबाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून धीर दिला व नंतर ताबडतोब रात्रीच आपल्या कार्यकर्त्यांना कनपटे कुटुंबीयांच्या भेटीला पाठविले. तोपर्यंत सील काढण्यात आले होते.mla parinay phuke कुठल्याही परिस्थितीत कारवाई होऊ देणार नाही, आम्ही पाठीशी आहोत असा धीर या कार्यकर्त्यांनी दिला. आ. यांनी खाजगी फायनान्स कंपनीचे विरोधात घेतलेली ही आक्रमक भूमिका दुष्काळाच्या काळात नक्कीच शेतकऱ्याला धीर देणारी ठरेल.
दरम्यान, या घटनेनंतर आमदार परिणय फुके यांनी केवळ संबंधित कुटुंबापुरती मदत मर्यादित न ठेवता, जिल्ह्यातील इतर नागरिकांनाही महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणतीही बँक अथवा फायनान्स कंपनी कर्जाच्या वसुलीसाठी त्रास देत असेल, धमकावत असेल किंवा नियमबाह्य पद्धतीने कारवाई करीत असेल, तर नागरिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी आ. फुके यांनी 7507676223 हा संपर्क क्रमांकही सार्वजनिक केला आहे. नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता संपर्क साधावा. त्यांच्या मदतीसाठी कार्यकर्ते तत्काळ धावून जातील आणि संबंधितांना आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले