तेहरान,
iran-4500km-missilesइराणने ४,५०० किमीपर्यंत मारक क्षमतेचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित केले आहे. होर्मुझ जलमार्गातील नाकाबंदी उधळत क्षेपणास्त्रासाठी लागणारे साहित्य इराणने आयात केले. इराणी क्षेपणास्त्रे हिंद महासागरातील डिएगो गार्सिया बेटापर्यंत पोहोचू शकते, जो अमेरिका आणि ब्रिटनसाठी एक महत्त्वाचा लष्करी तळ आहे. क्षेपणास्त्राची मारक क्षमता युरोपपर्यंत असल्याने अमेरिका आणि युरोपची चिंता वाढली आहे.
इराणी क्षेपणास्त्रांनी पश्चिम आशिया आणि इस्रायलमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर अनेक वेळा विध्वंस घडवून आणला. आता, इराणच्या इस्लामी रिव्होल्यूशनरी गार्डने ४,५०० किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे मिळवल्याने पश्चिम आशियाच्या पलीकडे अमेरिका आणि युरोपची चिंता वाढली आहे. ‘डिफेन्स सिक्युरिटी आशिया’च्या अहवालातून ही माहिती समोर आली. आयआरजीसीचे प्रवक्ते, ब्रिगेडियर जनरल हुसेन मोहेबी यांनी देशाच्या ४,५०० क्षेपणास्त्र क्षमतेचा संबंध दिएगो गार्सिया येथून केलेल्या हालचालींशी जोडला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवरील २,००० किलोमीटरची मर्यादा उठवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी ही टिप्पणी केली आहे. जनरल मोहेबी यांनी सांगितले की, इराणने ४,५०० किमीपर्यंत मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. वॉशिंग्टन आणि लंडन शहरापर्यंत आमचे क्षेपणास्त्र पोहोचू शकते. जनरल हुसेन मोहेबी यांनी म्हटले की, इराणी सैन्य पूर्णपणे तयार आहे. त्यांची बोटे ट्रिगरवर आहेत. आम्ही शत्रूने मूर्खपणाने वागण्याची वाट पाहत आहोत. जर हल्ला झाला, तर शत्रूला इराणी क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागेल. जर इराण इतक्या दूर पोहोचू शकला, तर अमेरिकेला आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा लागेल.
युरेनियम देशाबाहेर जाऊ देणार नाही : अराघची
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी इराणच्या सरकारी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, समृद्ध युरेनियम कोणत्याही दुसऱ्या देशाला सोपवणार नाहीत. शांतता करारानंतर अमेरिका पुन्हा हल्ला करणार नाही, याची त्यांना खात्री द्यावी लागेल. इराण केवळ सध्याच्या युद्धातून बाहेर पडण्यासाठी कोणताही समझोता करणार नाही. इराणला असा करार हवा आहे, जो दीर्घकाळ टिकेल आणि त्यानंतर पुन्हा लढाई सुरू होणार नाही.