संसदेतच खासदारानं तरुणीला केलं लग्नासाठी प्रपोज

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
मुंबई,
jordan-lane-proposes-in-parliamentऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स संसदेत गुरुवारी एक अत्यंत भावनिक आणि रोमँटिक क्षण पाहायला मिळाला. न्यू साऊथ वेल्सच्या संसदेत लिबरल पार्टीचे खासदार जॉर्डन लेन यांचं समारोपाचं भाषण सुरू होतं. मात्र, हे निरोपाचं भाषण अचानक एका अशा अनपेक्षिक क्षणात बदललं की सगळे बघतच राहिले. जॉर्डन यांनी दीर्घकाळ सोबत असलेल्या जोडीदार Natalie यांना संसदेतच थेट लग्नाची मागणी घातली. अंगठी काढताना त्यांचे हात थरथरत होते. त्यांनी "माझ्याशी लग्न करशील का?" असा प्रश्न विचारताच गर्लफेंडनं असं उत्तर दिलं की संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून गेलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 

jorden 
नेमका कसा घडला हा प्रसंग?
पहिल्याच कार्यकाळातील खासदार असलेले जॉर्डन लेन यांनी काही आठवड्यांपूर्वीच मार्च २०२७ मधील राज्य निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. गुरुवारी निरोपाचे भाषण देताना ते सभागृहाच्या मध्यभागी उभे होते आणि अचानक अध्यक्षांकडे वळून त्यांनी गर्लफ्रेंडला लग्नासाठी मागणी घातली. यावेळी त्यांच्या हातात अंगठी होती आणि हात थरथरत होते. पब्लिक गॅलरीत बसलेल्या Natalie कडे जात जॉर्डन यांनी रिंग काढली आणि गर्लफ्रेंडला घातली. हे पाहून गर्लफ्रेंडच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू तरळले. तिच्या होकारानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि किस केलं. हा प्रसंग पाहून सभागृहातील सदस्य उभे राहून टाळ्या वाजवू लागले.