सलमान खानने श्रद्धा कपूरची मागितली माफी!

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
मुंबई
salman khan
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत त्याचा सामना होणार आहे. सलमान खानचा ‘मातृभूमी’ आणि श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘ईठा’ हे दोन्ही चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर त्यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. मात्र, श्रद्धाचा चित्रपटही त्याच दिवशी प्रदर्शित होत असल्याचे समजल्यानंतर सलमानने तिची माफी मागितली. एवढेच नाही, तर श्रद्धाचा चित्रपट पाहण्याचे आवाहनही त्याने प्रेक्षकांना केले आहे.




खरं तर, सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाचे प्रदर्शन सुरुवातीला २७ नोव्हेंबर रोजी नियोजित होते. मात्र, याच दिवशी दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा ‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सूरज बडजात्या यांच्या चित्रपटासोबत आपला चित्रपट प्रदर्शित करणे शक्य नसल्याचे सलमानने स्पष्ट केले. याबाबत बोलताना त्याने सांगितले की, ‘ये प्रेम मोल लिया’च्या प्रदर्शनाच्या दिवशी ‘मातृभूमी’ प्रदर्शित होऊ शकत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांबाबत बोलताना सलमानने शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान यांच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाचाही उल्लेख केला. हा चित्रपट २४ तारखेला प्रदर्शित होणार असल्याने त्याच दिवशी ‘मातृभूमी’ प्रदर्शित करण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, ‘किंग’च्या प्रदर्शनाच्या एक आठवडा आधी ‘एवेंजर्स : डूम्सडे’ आणि ‘ड्यून पार्ट ३’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांसोबत आपला चित्रपट प्रदर्शित करण्यास सलमानची कोणतीही हरकत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यांच्यासोबत बॉक्स ऑफिसवर सामना करण्यास आपण तयार असल्याचेही त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर एका आठवड्याने शाहरुख आणि सुहाना यांचा ‘किंग’ चित्रपट येणार असल्याने त्या कालावधीतही ‘मातृभूमी’ प्रदर्शित करता येणार नाही. अखेर या सर्व तारखांचा विचार करून सलमानने ४ डिसेंबर ही ‘मातृभूमी’च्या प्रदर्शनासाठी निश्चित केली.

दरम्यान, ‘मातृभूमी’ आणि श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या चित्रपटांची प्रदर्शनाची तारीख एकच असल्याचे समजल्यानंतर सलमान खानला वाईट वाटले. याबाबत प्रतिक्रिया देताना त्याने श्रद्धासोबत झालेल्या संवादाचा खुलासा केला. सलमान म्हणाला, "मी श्रद्धाला माझ्या डोळ्यांसमोर मोठं होताना पाहिलं आहे. मी तिला फोन केला आणि माझ्यामुळे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याबद्दल तिची माफी मागितली."

सलमानच्या या फोनवर श्रद्धा कपूरनेही दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेत आहे. तिने सलमानला उत्तर देताना, "काही हरकत नाही सर. दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊ शकतील, इतका वेळ तर आहेच," असे म्हटले. श्रद्धाच्या या उत्तरानंतर सलमाननेही तिच्या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. प्रेक्षकांनी श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ हा चित्रपटही आवर्जून पाहावा, असे आवाहन त्याने केले.

त्यामुळे ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ या दोन्ही चित्रपटांकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. सलमान खान आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटांपैकी बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट प्रेक्षकांची अधिक पसंती मिळवतो आणि कोणता चित्रपट कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.