सेलू,
sugar-truck-overturns-driver-injuredयेथील अशोका रेस्टॉरेंटसमोर मध्यरात्री सुमारे ३ वाजताच्या सुमारास साखर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यात ट्रक चालक जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथून रांजनगावकडे सीजी ०४ क्यूएस २९७६ क्रमांकाचा ट्रक साखर घेऊन जात असताना चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्यावर उलटला.
या अपघातात चालक मोरधूज शाहू (३५) रा. रांजनगाव हा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला. यावेळी पोलिस मित्र धनराज पांडे, हवालदार गणेश राऊत यांनीही घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक खोळंबली होती.