मानोरा,
rui-village तालुयातील शेवटच्या टोकावर असलेल्या वटफळ, मेंद्रा, इंगलवाडी, गोस्ता व रुई या गावातून यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करणारी पुस नदी यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यंतरीच कोरडी पडली असून, पाऊसमान कमी झाल्यामुळे हा बदल नदीपात्रात व परिसरात स्पष्टपणे जाणवत असल्याची बाब समोर आली आहे. पुस नदीची सध्याची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. संपूर्ण पात्रात पाणी आटून केवळ ठिकठिकाणी छोटे-छोटे डोह शिल्लक राहिले आहेत. पात्रात वाळू, गोटे, खडक उघडे पडले आहेत. दोन्ही काठांवर हिरवळ सुकू लागली आहे.
जिथे पूर्वी बारमाही वाहते पाणी दिसायचे, तिथे आता चालत जाता येईल एवढेच पाणी उरले आहे. नोव्हेंबर महिन्यातच नदीची ही अवस्था पाहून गावकरी चिंतेत पडले आहेत. स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या माहितीनुसार, पूर्वी पुस नदीत जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत पाणी वाहायचे. उन्हाळ्यातही डोहात पाणी शिल्लक राहायचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटले, पावसाळ्यातील पावसाचे दिवस कमी झाले, भूजल पातळी खालावली, त्यामुळे नदी लवकर आटू लागली आहे. यावर्षी तर पावसाळा लवकर संपल्याने नोव्हेंबर मध्येच नदी कोरडी पडली आहे.
वटफळ, मेंद्रा, इंगलवाडी, गोस्ता आणि रूई या गावातील शेतकर्यांची शेती पुस नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यासाठी नदीच्या पाण्याचा व डोहातील पाण्याचा वापर केला जातो. नदी आटल्याने रब्बी पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. विहिरी, बोअरवेलची पातळीही खालावण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.जनावरांना पाण्याची टंचाईनदीपात्र हेच या भागातील जनावरांसाठी मुख्य पाणवठा आहे. गाय, म्हैस, शेळ्या-मेंढ्या यांना रोज नदीवर पाणी पाजण्यासाठी आणले जाते. नदी कोरडी पडल्याने जनावरांना दूरवर पाणी शोधावे लागत आहे. उरलेल्या डोहातील पाणीही दूषित होत चालले आहे, त्यामुळे जनावरे आजारी पडण्याची भीती आहे.
पुस नदीत पूर्वी विविध प्रकारचे मासे, खेकडे, पक्षी आढळायचे. नदी आटल्याने मासेमारी करणार्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच नदीकाठावरील पक्षी, वन्यजीवही पाण्याअभावी स्थलांतर करू लागले आहेत. नदीपात्रात पाणी अडविण्यासाठी ठिकठिकाणी छोटे बंधारे, कोल्हापूरी बंधारे बांधावेत, नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करावे, तसेच पाणलोट क्षेत्रात वृक्षलागवड करावी, अशी मागणी गोस्ता, रुई, वटफळ, मेंद्रा, इंगलवाडी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शयता असल्याने प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, अशीही मागणी होत आहे.