सेवाग्राम,
ncc भारतीय सैन्य दलाच्या धर्तीवर युवा पिढी तयार व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून राष्ट्रीय छात्र सेना शाळा व महाविद्यालयातील मुला मुलींना सैनिकी प्रशिक्षण देत असते. प्रशिक्षणातून छात्र सैनिकांच्या अंगी शिस्त, साहस, कर्तव्याची जाणीव, नेतृत्व कला, देशभक्ती, समर्पण व जबाबदार नागरिकांचे गुण विकसित केले जाते. एनसीसीचे छात्रसैनिक देशाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल जिसांतो यांनी केले.सेवाग्राम,
ncc भारतीय सैन्य दलाच्या धर्तीवर युवा पिढी तयार व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून राष्ट्रीय छात्र सेना शाळा व महाविद्यालयातील मुला मुलींना सैनिकी प्रशिक्षण देत असते. प्रशिक्षणातून छात्र सैनिकांच्या अंगी शिस्त, साहस, कर्तव्याची जाणीव, नेतृत्व कला, देशभक्ती, समर्पण व जबाबदार नागरिकांचे गुण विकसित केले जाते. एनसीसीचे छात्रसैनिक देशाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल जिसांतो यांनी केले.
सेवाग्राम येथे बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित एनसीसीच्या विशेष शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून एनसीसीचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल आर. के. सामानंदा व सुबेदार मेजर गुरुप्रीत सिंग उपस्थित होते.
शिबिरात २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे तसेच नागपूर विभागातील ४५० शालेय व महाविद्यालयीन एनसीसी छात्र सैनिक सहभागी झालेले आहेत. त्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्याकरिता २ सुबेदार, १७ एनसीओ व ४ एनसीसी अधिकारी शिबिरात कार्यरत आहेत.
शिबिरात ड्रिल, अडथळा पार प्रशिक्षण, निशानेबाजी, मॅप रीडिंग, जजिंग डिस्टन्स, फिल्ड क्राफ्ट, युद्धकला, नेतृत्व कला, शारीरिक कवायत, मैदानी खेळ, प्रश्नमंजुषा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाचा समावेश आहे.