धुळे,
9 killed in collision on Kota-Udaipur National Highwayधुळे जिल्ह्यातल्या 9 जणांचा राजस्थानात झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. कोटामध्ये उभ्या ट्रकला क्रूझर धडकल्यानं भीषण अपघात झाला. यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. खाटूश्यामजींच्या दर्शनानंतर धुळ्याला परत येताना अपघात झाला.राजस्थानमध्ये खाटू श्यामजींच्या दर्शनावरून महाराष्ट्राकडे परतत असलेल्या एका कुटुंबाचा शंभूपुरा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 9 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे अपघातातील सर्व मृत हे एकाच पवार कुटुंबातील होते. कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, क्रूझर गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि त्यातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली... खाटू श्यामजींच्या दर्शनावरून धुळ्याला परतत असताना हा अपघात झाला.
महाराष्ट्रातील धुळे येथील तीन कुटुंबे स्वतंत्र वाहनांतून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेली होती. दर्शनावरून परतताना, रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, क्रूझर गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि त्यातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नंता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.