बारामतीत बिल्डरवर गोळीबार, 8 तासात हल्लेखोरांचा गेम ओव्हर

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
बारामती,
baramati-firing-caseपुणे जिल्ह्याच्या बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभो नगर येथे बांधकाम व्यावसायिक राजन धनंजय कोळेकर यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर शनिवारी सायंकाळी गोळीबार करण्यात आला. या प्रकरणाचा बारामती तालुका पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या आठ तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत.
 

baramati  
शनिवारी 21 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादी राजन धनंजय कोळेकर (वय 35, रा. अनन्या व्हिला, शिवशंभो नगर, नक्षत्र गार्डनच्या पाठीमागे, बारामती) यांच्याकडे बंड्या उर्फ अक्षय काळे व त्याच्या दोन साथीदारांनी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर पिस्तुलातून गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 576/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(3), 308(4), 3(5) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 35 व 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.