तभा वृत्तसेवा
फुलसावंगी,
save the vote save the nation देशातील लोकशाही मूल्ये अबाधित राखणे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतदानाच्या मूलभूत अधिकाराबाबत जनजागृती निर्माण करणे, या मुख्य उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘वोट बचाओ, देश बचाओ’ हे व्यापक अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात महागाव तालुक्यातील ग्रामीण भागात भव्य पदयात्रा आणि थेट जनसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील राहुर, शिरपुली, फुलसावंगी, काळी, टेंभी आणि भांब या प्रमुख गावांमधून ही जनजागृती रॅली काढण्यात आली असून, या मोहिमेला स्थानिक ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद लाभला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. सचिन नाईक यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या संपूर्ण अभियानाचे नियोजन करण्यात आले. या पदयात्रेत पक्षनेते आणि पदाधिकाऱ्यांनी गावागावांतील चौकाचौकांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला.
यावेळी संबोधित करताना त्यांनी भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित केले. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग किती निर्णायक आहे, याबाबत सविस्तर भूमिका मांडत मतदान प्रक्रियेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती उपक्रमामध्ये महागाव तालुका अध्यक्ष सुनील राठोड, स्वप्नील नाईक, कुणाल नाईक, युवक काँग्रेसचे उमरखेड विधानसभा अध्यक्ष इम्रान पठाण, बंटी पठाण बाळू नाईक, विजय पाटील यांच्यासह मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मुख्तार पठाण यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.save the vote save the nation काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि राहुर, शिरपुली, फुलसावंगी, काळी, टेंभी व भांब येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या जनसंवाद व पदयात्रेत सहभागी झाले होते.