आर्वीत स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशन पत्रात खोटी माहिती

नप विरोधी पक्ष नेते प्रा. वाघमारे यांचा आरोप

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
आर्वी,
arvi नगर परिषद आर्वी येथील स्विकृत सदस्य प्रशांत ठाकुर तसेच सुनील वाजपेयी यांनी नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये चुकीची व खोटी माहिती शासनास पुरविल्याने त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकार्यांकडे १८ रोजी अपिल दाखल केली आहे, अशी माहिती विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत नप विरोधी पक्ष नेते प्रा. पंकज वाघमारे यांनी दिली.
 
 
स्वीकृत सदस्यांनी नामनिर्देश पत्र सादर करताना ज्या संस्थेचे पदाधिकारी म्हणून दस्तावेज सादर केले त्या चंद्रशेखर आझाद बहुउद्देशिय शिक्षण संस्था, आर्वी तसेच नवयुवक कला व क्रिडा मंडळ या दोन्ही संस्थांची नोंदणी धर्मादाय आयुक्तांनी रद्द केलेली असल्याची माहिती त्यांनी दिली. नपच्या ११ सदस्यांनी जिल्हाधिकार्यांकडे अपील सादर करुन बाजपेयी आणि ठाकूर या दोन्ही स्वीकृत सदस्यांना अपात्र घोषीत करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
पत्रकार परिषदेला विरोधी पक्ष नेते व विरोधी पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. विरोधी पक्ष गटनेता यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शासनाने स्वीकृत सदस्याकरिता जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीनुसार आवश्यक त्या अटीची व कागदपत्रांची पूर्तता करूनच नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते. कागदपत्राची छाननी करूनच आमची नियुक्ती नामनिर्देश सदस्य म्हणून करण्यात आली आहे. विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप राजकीय असल्याची माहिती स्वीकृत सदस्य प्रशांत ठाकूर, सुनील बाजपेयी यांनी दिली.