४५ वर्षांनंतर जुने वर्गमित्र आले एकत्र

जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलन

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
उंबर्डा बाजार,
students gathered for reunion येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९८१ मधील आजी-माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा स्नेहसंमेलन सोहळा २१ नोव्हेंबर रोजी महाविद्यालय परिसरात अत्यंत उत्साहात पार पडला. तब्बल ४५ वर्षांनंतर हे सर्व मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा एकाच ठिकाणी एकत्र आल्याने संपूर्ण वातावरण आनंदून गेले होते.
 
 
students gathered for reunion
 
काळाच्या ओघात सर्वच जण वेगवेगळ्या व्यवसायात आणि शहरात स्थायिक झाले असले, तरी या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येत आपल्या बालपणीच्या आणि शाळकरी दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. वर्गातील गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि जुन्या आठवणींवर सर्वांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ४५ वर्षांनंतर एकमेकांना भेटल्याचा भावूक आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आत्माराम दहात्रे होते तर प्रमुख मार्गदर्शक खपली सर होते. प्रसंगी सर्वांनी मिळून जुन्या आठवणींना उजाळा देणारे उपक्रम राबवले.students gathered for reunion तर एकमेकांच्या खुशालीची विचारपूस केली आणि सामूहिक भोजनाचा आनंद घेतला. ’पुन्हा लवकरच भेटू’ असा निश्चय करत आणि जुन्या आठवणींची शिदोरी सोबत घेत या सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वाकोडे यांनी केले. अशा आगळ्यावेगळ्या स्नेहमेळाव्याचे कौतुक परिसरातील नागरिकांकडून होत आहे.