रविवारी आराम करण्यापेक्षा संधीचा फायदा घ्या!

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
gold-silver-prices-fall-indiaआठवड्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेली सोने-चांदीच्या दरातील घसरण आठवड्याच्या शेवटीही कायम आहे. गेल्या महिन्यापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या एका महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 18,960 रुपयांची घट झाली आहे. तर दुसरीकडे, चांदीचा दरही प्रति किलो 27,070 रुपयांनी घसरला आहे.
 
gold
 
रविवारीही भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोन्याच्या दरात घसरण सुरू असतानाच चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या आजचे ताजे दर…
ऑल इंडियन बुलियन मार्केट, झवेरी बाजारने दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्या-चांदीचे दर –
सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने – 1,26,784 रुपये
22 कॅरेट सोने – 1,16,134 रुपये
18 कॅरेट सोने – 95,088 रुपये
सोन्याचे दर (प्रति 1 ग्रॅम)
24 कॅरेट – 12,678 रुपये
22 कॅरेट – 11,613 रुपये
18 कॅरेट – 9,509 रुपये
चांदीचे दर
999 शुद्ध चांदी – 1,54,054 रुपये प्रति किलोग्रॅम
999 शुद्ध चांदी – 1,541 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदीचा दर – 154 रुपये प्रति ग्रॅम