यवतमाळात कुस्त्यांची विराट दंगल

15 लाख रुपयांची जंगी लूट, नामवंत मल्ल होणार सहभागी

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
wrestling tournament महाराष्ट्रातील मल्लविद्येच्या विकासचक्राला गती देण्यासाठी लाल मातीतील कुस्ती स्पर्धांची परंपरा कायम राखत यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुधवार, 25 नोव्हेंबर रोजी तब्बल 15 लाख रुपयांची रुपयांची जंगी लयलूट असलेल्या भव्य इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल आयोजित केली आहे. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात बुधवारी दुपारी 1 पासून हलगी, तुतारी आणि डफ या शिवकालीन वाद्यांच्या गजरात स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
 

wrestling tournament  
 
माजी खासदार विजय दर्डा, माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार बाळासाहेब मांगुळकर, माजी आमदार कीर्ती गांधी व किशोर दर्डा यांच्या मार्गदर्शनात ही दंगल होणार आहे. कुस्ती शौकिनांना या दंगलीत प्रवेश नि:शुल्क राहणार आहे. स्पर्धेचे पहिले बक्षीस 1 लाख रुपये व दुसरे बक्षीस 71 हजार रुपये जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे दिले जाणार आहे.wrestling tournament तिसरे बक्षीस 51 हजार रुपये यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष सुभाष बाजोरिया यांच्या स्मृतिनिमित्त दिले जाईल.
चौथे बक्षीस 41 हजार रुपये जनता नागरी पतसंस्थेतर्फे, पाचवे बक्षीस 31 हजार रुपये गोदावरी अर्बनतर्फे, सहावे बक्षीस 25 हजार रुपये चिंतामणी पांडे स्मरणार्थ बाळासाहेब पांडे नागरी पतसंस्थेतर्फे दिल्या जाणार आहे. सोबतच 21 हजार, 15 हजार, 10 हजार, 7 हजार, 6 हजार आणि 6 हजार रुपये अशीही बक्षिसे आहेत.
पंच म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव अनिल पांडे, उद्धव बाकडे, प्रदीप जयस्वाल, मोहम्मद शकील, अ‍ॅड. धनंजय लोखंडे, संदीप नेवारे, सुभाष जुमळे, चेतन उगले, आनंद जाधव, जितू बन्नावळे काम सांभाळणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी व्हावे अशी विनंती जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष प्रभाकर गटलेवार, सचिव अनिल पांडे, उपाध्यक्ष कुलभूषण तिवारी, रामेश्वर यादव, संघटक प्रताप पारसकर, दीपक ठाकूर, कोषाध्यक्ष अनंत जोशी, सहसचिव सुरेश जयसिंगपुरे यांनी केले आहे.