जुरेलचा सुपरमॅन अवतार! हवेत झेपावत टिपला भन्नाट झेल

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
वेलिंग्टन,
jurels-superman-avatar भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करताना जुरेलने हवेत झेप घेत एका हाताने घेतलेला अप्रतिम झेल पाहून मैदानावरील खेळाडूंसह प्रेक्षकही थक्क झाले. त्याच्या या झेलमुळे न्यूझीलंडचा महत्त्वाचा फलंदाज हेन्री निकोल्सला माघारी परतावे लागले.
 
jurels-superman-avatar
 
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या निकोल्सने १७५ धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र, दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी त्याच्याविरुद्ध वेगळी रणनीती आखली. त्याला धावा करण्यापासून रोखण्यासाठी विकेटच्या आसपास आत वळणारे चेंडू टाकण्यावर भर देण्यात आला.
 
प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर २३व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ही रणनीती यशस्वी ठरली. बॅक ऑफ अ लेंथ चेंडूवर निकोल्सने मागे सरकत लेग साईडला फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटच्या आतील कडेला लागून थाय पॅडवर आदळला आणि शॉर्ट लेगच्या दिशेने उडाला. याच वेळी सज्ज असलेल्या ध्रुव जुरेलने उजव्या हाताने हवेत झेप घेत चेंडू टिपला. हा झेल पाहून निकोल्सलाही आपल्या बाद होण्यावर विश्वास बसत नव्हता.
 
या कसोटीत जुरेलने केवळ क्षेत्ररक्षणातच नव्हे, तर फलंदाजीतही आपली छाप पाडली. भारतीय संघाच्या पहिल्या डावात त्याने आक्रमक फलंदाजी करत ७८ धावा फटकावल्या. या खेळीत त्याने सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश केला. त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारताला पहिल्या डावात ३५० धावांची आघाडी मिळवण्यात मदत झाली. त्यामुळे जुरेलच्या अप्रतिम झेलसह त्याच्या फलंदाजीचीही चर्चा रंगली आहे.