22 जनावरे, 2 माणसांचा जीव घेणारा वाघ अखेर जेरबंद

भंडारा वनविभागाच्या अडीच तासाच्या मोहिमेनंतरवाघाला पकडण्यात यश

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
भंडारा,
tiger captured भंडारा आणि अड्याळ वनपरिक्षेत्रात संचार करून परिसरातील गावात दहशत माजवीत 22 जनावरांसह दोन माणसांचा जीव घेणाऱ्या पट्टेदार वाघाला जेरबंद करण्यात अखेर भंडारा वनविभागाला अडीच तासाच्या मोहिमेनंतर यश आले. भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रावणवाडी टोली येथे ही मोहीम फत्ते करण्यात आली. 15 दिवसांच्या आधी मजुरीच्या कामावरून परत येणाऱ्या एका व्यक्तीचा जीव घेणारा हाच वाघ होता. हा जेरबंद झाल्याने आता परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. भंडारा आणि अड्याळ वनपरिक्षेत्रात वावर असलेल्या या वाघाने काही महिन्यांमध्ये चांगलाच गोंधळ घातला होता.
 

tiger captured 
 
 
या दोन्ही वनपरिक्षेत्राच्या आजूबाजूच्या गावांमधील जवळपास 22 जनावरांचा फडशा या वाघाने पडला. तर दोन माणसांचा जीवही या वाघाने घेतला होता. मे महिन्यात खांबाडी येथे तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी बासोरा येथे वाघाने माणसांवर हल्ला करीत त्यांना ठार केले होते.
मागील अडीच ते तीन वर्षांपासून भागाकडून या वाघावर लक्ष ठेवले जात होते. दरम्यान वाघाची प्रचंड दहशत त्याला जेरबंद करण्याच्या दृष्टीने वनविभागाने हालचाली सुरू केल्या. मागील काही दिवसांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते.tiger captured दरम्यान आज 21 नोव्हेंबर रोजी भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रावणवाडी टोली येथे राबविलेल्या मोहिमेत वाघाला जेरबंद करण्यात यश आले. स्थानिक शीघ्र बचाव दलासह भंडारा आणि नवेगाव नागझिरा येथील दलाच्या जवान व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मोहीम भक्ती केली. नर जातीचा हा वाघ अंदाजे पाच ते सात वर्षाचा असल्याचे सांगण्यात येते. जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हा चंद्रपूर चा त्रिशूल नाही : निलख
भंडारा येथे पकडण्यात आलेला वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील त्रिशूल असल्याचे चर्चा जोरात आहे. हा वाघ भंडारा जिल्ह्यातील असून चंद्रपुरातील त्रिशूल नाही. ग्रामीण भागातील नागरिकांनी त्याच्या अंगावर असलेल्या पट्ट्यांच्या आधारे याचेही नामकरण त्रिशूल केले आहे मात्र, वाघ हा भंडारा जिल्ह्यातीलच असल्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक सचिन निलख यांनी तरुण भारताशी बोलताना सांगितले.