आज ‘आंतरराष्ट्रीय आत्महत्या शोकग्रस्त कुटुंब आधार दिन’

विद्यार्थी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना सांत्वनाची गरज

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
international suicide bereaved आत्महत्येतून आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना भावनिक आधार दिला पाहिजे, एक संवेदनशील आणि जागरूक व्यक्ती म्हणून ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे विचार शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तथा समाजसेवक डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी मांडले.
 

international suicide bereaved  
 
 
जगभरात 22 नोव्हेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय आत्महत्या शोकग्रस्त कुटुंब आधार दिन’ साजरा केला जातो, या पार्श्वभूमीवर त्यांनी विशेषतः विद्यार्थी आणि शेतकरी आत्महत्यांच्या घटनांवर चिंता व्यक्त करीत अशा दुर्दैवी घटनांवर आळा घालण्यासाठी काही सकारात्मक पर्यायांवर त्यांनी चर्चा केली. शोकग्रस्त कुटुंबियांचे दु:ख कमी करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी या पार्श्वभूमीवर आत्महत्येसारख्या घटनांना रोखण्यासाठी उपयुक्त अशी माहिती दिली.
आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांना मोठ्या मानसिक आणि भावनिक आघातातून जावे लागते. अशांना एकटेपणा जाणवू नये, त्यांना वेळोवेळी मानसशास्त्रीय समुपदेशन आणि भावनिक आधार दिला पाहिजे. शेतकरी आत्महत्याग्रस्त आधीच कुप्रसिद्धीस आलेल्या या जिल्ह्याचा हा बट्टा पुसण्यासाठी समाजात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले.international suicide bereaved एनसीआरबीच्या मागील अहवालानुसार राज्यनिहाय आकडेवारीचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक 1909 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांमागे केवळ शैक्षणिक ताण किंवा परीक्षेतील अपयश हे एकटे कारण नसून कौटुंबिक समस्या, मानसिक आरोग्य, करिअरविषयक अनिश्चितता, एकाकीपणा, सामाजिक दबाव आणि इतर वैयक्तिक परिस्थिती कारणीभूत असू शकतात, असेही डॉ. मेश्राम यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2022 ते जून 2026 या 54 महिन्यांत वेगवेगळ्या कारणांतून तब्बल 13,928 शेतकèयांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा अत्यंत निराशाजनक आहे. जेव्हा कुणी आत्महत्येचा विचार करतो तेव्हा तो आपल्या वागणुकीतून धोक्याचे इशारे देत असतो, अशा आत्मघातकी लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नये, असे आवाहन डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी केले.