भारताच्या GDP वर ट्रम्प फिदा; फेडरल रिझर्व्हवर निशाणा!

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
trump-praises-india-gdp-criticizes-fedभारताचा ७ टक्के जीडीपी विकासदर आणि रिझर्व्ह बँकेचे कमी व्याजदर यांचा दाखला देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हवर उच्च व्याजदर कायम ठेवल्याबद्दल टीका केली. व्याजदर कमी केल्यास अमेरिकेचा आर्थिक विकासदर १५ ते २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
 

trump on GDA 
व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी, फेडरल रिझर्व्ह राजकीय प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. अमेरिकेची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असल्याचे आकडे जाहीर होताच फेडरल व्याजदर वाढवते, असे ते म्हणाले. मजबूत आर्थिक स्थिती पाहता व्याजदर कमी करायला हवेत, असा त्यांचा आग्रह होता.
भारताचे म्हणाले, उदाहरण देत ट्रम्प भारतात कमी व्याजदर असून जीडीपी विकासदर सात टक्के आहे. अमेरिकेतही व्याजदर कमी केले तर विकासदर १४, १५ किंवा २० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. अमेरिकेने सर्वात कमी व्याजदर ठेवायला हवेत, असेही त्यांनी म्हटले.