प्रेयसीच्या पोटातील बाळाचा मृत्यू ; प्रेमसंबंधाचा शेवट पोलिस ठाण्यात!

प्रियकर-प्रेयसीविरुद्ध गुन्हा ; आईच्या तक्रारीनंतर प्रकरण उघड

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
love-affair-ends-at-the-police-station प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याला अनपेक्षित वळण मिळाले आणि पाच महिन्यांचा गर्भ दुःखदरीत्या पोटातच संपला. गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या १८ वर्षीय तरुणीची नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसूती झाली; मात्र, बाळ मृतावस्थेत जन्माला आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणासह तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

love-affair-ends-at-the-police-station
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तरुणीचे संबंधित तरुणासोबत गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या संबंधातून प्रेयसी गर्भवती राहिली. दोघांनाही गर्भधारणा पुढे सुरू ठेवायची नव्हती. त्यातून प्रियकराने गर्भपाताच्या गोळ्या मिळवून प्रेयसीला दिल्या. या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला तातडीने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी प्रसूती केली; मात्र, पाच महिन्यांच्या गर्भातून जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला. एका नात्यातून जन्माला येण्याची चाहूल लागलेल्या जीवाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. घटनेनंतर तरुणीच्या ४६ वर्षीय आईने जुनी कामठी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मुलगी गर्भवती असल्याची आणि त्यानंतर घडलेल्या घटनांची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी प्रियकरासह प्रेयसी या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित तरतुदींसह लागू कायद्यांनुसार गुन्हा नोंदविला आहे.
गर्भपात केल्यानंतर करणारे होते लग्न
गर्भपाताच्या गोळ्या नेमक्या कुठून आणल्या?, त्या कोणाच्या सल्ल्याने घेतल्या? आणि गर्भाच्या मृत्यूमागील वैद्यकीय कारण काय?, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणार आहेत. या प्रकरणात गर्भपाताच्या गोळ्यांची उपलब्धता, त्यांचे सेवन आणि त्यानंतर उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीची चौकशी सुरू आहे. गर्भाच्या मृत्यूचे नेमके कारण आणि दोघांची जबाबदारी तपासातून निश्चित होणार आहे. त्यामुळे सध्या समोर आलेले आरोप हे तक्रारीतील दावे असून, त्यांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.