कारंजा (घाडगे)
wardha farmer २१ नोव्हेंबर दुष्काळाचे सावट गडद होत असताना पाणीटंचाई लक्षात घेता एका शेतकर्याने आपल्या शेतातील २० टन संत्री तोडून फेकली. हा प्रकार कारंजा घाडगे तालुक्यातील दाभा येथे घडला. रामदास नासरे असे, वैफल्यग्रस्त शेतकर्याचे नाव आहे. नासरे यांनी संभाव्य दुष्काळाची भीती आणि विहिरींमधील खालावलेली पाणीपातळी पाहता. आपल्या चार एकर शेतातील ६५० संत्र्याच्या झाडांवरील सुमारे २० टन संत्री तोडून फेकून दिली आहे.
s

संपूर्णबागेत संत्री विखुरलेली पडली आहेत. प्रखर उन्हात ही फळे खराब होताना पाहून नासरे कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेतकरी नासरे यांनी चार एकर क्षेत्रात ६५० संत्र्याची झाडे जोपासली होती. त्यांनी महागडी खते, कीटकनाशके आणि बागेच्या देखभालीवर लाखो रुपये खर्च केले होते. तसेच बागेत आधुनिक सचिन प्रणालीही बसवली होती. त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले आणि यंदा झाडांना चांगल्या प्रमाणात मृत बहारची संधी लागली होती. झाडांवरील सुमारे २० टन संत्री पाहून नासरे कुटुंबाला आशा होती की, यावेळी त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगरही कमी होईल, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या. यंदा पावसामुळे कमतरता निर्माण झाल्याने कारंजा तालुक्यातील भूजल पातळी लक्षणीयरित्या खालावली आहे. दाभा परिसरातील विहिरी आटल्या असून, सिंचनासाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.