वनौषधी व निसर्ग उद्यानाचे नागरिकांना आकर्षण

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
यवतमाळ,
yavatmal-ayurvedic-herbal-gardenनिसर्गाचे संवर्धन, औषधी वनस्पतींचे जतन, आयुर्वेदाचे ज्ञान आणि मानवी जीवनात वृक्षांचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटर, गोधणी बायपास, यवतमाळ येथे एक विशेष वनौषधी व निसर्ग उद्यान विकसित करण्यात आले आहे. निसर्गाशी नाते जोडणारे, आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणारे आणि भारतीय परंपरेतील वृक्षसंस्कृतीची ओळख करून देणारे हे उद्यान नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरले आहे.
या उद्यानाचे विशेष आकर्षण म्हणजे नक्षत्र वन, ग्रह-राशीनुसार वृक्ष लागवड, पंचवटी आणि विविध दिव्य व औषधी वनस्पतींचा संग्रह. भारतीय परंपरेत नक्षत्र, ग्रह, राशी आणि वृक्ष यांच्यातील संबंधाला विशेष महत्त्व दिले आहेे. प्रत्येक वृक्षाचे धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि औषधी महत्त्व समजून घेण्याची संधी येथे मिळते.
 

nature 
उद्यानातील ‘नक्षत्र वन’ ही संकल्पना विशेष आकर्षण असून येथे विविध नक्षत्रांशी संबंधित वृक्षांची ओळख करून देण्यात आली आहे. तसेच ग्रह आणि राशींनुसार वृक्षांची मांडणी करून भारतीय वृक्षपरंपरा आणि निसर्गविज्ञान यांची सांगड घालण्याचाची प्रयत्न करण्यात आला आहे.
पंचवटी ही भारतीय संस्कृतीतील एक पवित्र संकल्पना असून पाच महत्त्वपूर्ण वृक्षांच्या माध्यमातून निसर्ग, अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येतो. पंचवटीच्या माध्यमातून वृक्षांचे महत्त्व, मानवी जीवनातील निसर्गाची भूमिका आणि वृक्षसंवर्धनाची आवश्यकता अधोरेखित होते. विविध दुर्मिळ, पारंपरिक आणि औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची लागवड केली आहे. वनौषधींच्या माध्यमातून आयुर्वेदातील ज्ञान, वनस्पतींची ओळख, त्यांचे उपयोग आणि निसर्गाशी समतोल राखण्याचे महत्त्व अधोरेखित होते.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत निसर्गापासून दूर जाणार्या समाजाला पुन्हा वृक्ष, वनस्पती, माती आणि पर्यावरणाशी जोडण्याची गरज आहे. विद्यार्थी, आयुर्वेद अभ्यासक, संशोधक, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांसाठी हे उद्यान ज्ञान, प्रेरणा व अनुभवाचे केंद्र बनू शकते. सामका आयुर्वेदचे हे उद्यान निसर्ग संवर्धन, आयुर्वेदिक ज्ञान, भारतीय संस्कृती व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा एक अभिनव उपक्रम आहे.