मुंबई,
stock market sensex आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सुरुवातीला जोरदार तेजीने व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळातच बाजाराने अचानक दिशा बदलली आणि सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स सुरुवातीच्या सत्रात तब्बल ७४३ अंकांनी वधारून ८४,६६२ अंकांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने दुपारी १ वाजेपर्यंत तो दिवसाच्या उच्चांकावरून तब्बल १,८०० अंकांनी घसरून ८२,८६२ अंकांवर आला. या अचानक झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही या पडझडीतून सुटू शकला नाही. मागील व्यवहाराच्या दिवशी २५,८०० अंकांवर बंद झालेल्या निफ्टीने सोमवारी २५,९२९ अंकांवर सुरुवात केली. सुरुवातीच्या तेजीमुळे निर्देशांक २५,९९२ अंकांपर्यंत पोहोचला होता. मात्र, त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर वाढल्याने निफ्टी दिवसाच्या उच्चांकावरून ५२५ अंकांहून अधिक घसरून २५,४६७ अंकांवर व्यवहार करत होता. सुरुवातीला सकारात्मक संकेत देणाऱ्या बाजाराने अचानक घेतलेल्या या घसरणीच्या वळणामुळे अल्पावधीतच मोठे नुकसान झाले.
या घसरणीचा सर्वाधिक फटका गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीला बसला आहे. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य मागील शुक्रवारी सुमारे ५१५ लाख कोटी रुपये होते.stock market sensex सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत हे मूल्य घटून जवळपास ५१० लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजेच अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ५ लाख कोटी रुपयांची घट झाली. बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.