न्यूझीलंडने रोखला भारताचा विजय; WTC गुणतालिकेत फटका!

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
new-zealand भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेली पहिली कसोटी अखेर अनिर्णित राहिली. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी विजय मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना करत विकेट पडू दिल्या नाहीत. त्यामुळे विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय संघाला अखेर बरोबरीवर समाधान मानावे लागले. या निकालाचा परिणाम आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेवरही झाला आहे.
 
shubhaman gil
 
या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी (PCT) ७५ टक्के आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने एका स्थानाची प्रगती करत दुसरे स्थान मिळवले असून त्यांची पीसीटी ६९.२३ टक्के झाली आहे. भारताविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्याने न्यूझीलंडला एका स्थानाची घसरण सहन करावी लागली आहे. सामन्यापूर्वी ७२.२२ टक्के असलेली न्यूझीलंडची पीसीटी आता ६६.६७ टक्क्यांवर आली असून संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
 
भारतीय संघाच्या क्रमवारीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर कायम आहे. मात्र, अनिर्णित निकालामुळे भारताच्या विजयाच्या टक्केवारीत घट झाली आहे. सामन्यापूर्वी ५१.५२ टक्के असलेली भारताची पीसीटी आता ५० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील स्थान कायम असूनही भारतीय संघाला नुकसान सहन करावे लागले आहे. भारताच्या पाठोपाठ बांगलादेश ४०.७४ टक्के पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे.
 
दरम्यान, या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३६८ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी करत ७२० धावांवर पहिला डाव घोषित केला आणि मोठी आघाडी मिळवली. मात्र, दुसऱ्या डावात न्यूझीलंडने भारतीय गोलंदाजांना रोखण्यात यश मिळवले. त्यांनी पाच विकेट गमावत २३९ धावा केल्या. अखेर दोन्ही संघांमधील हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.