तभा वृत्तसेवा
उमरखेड,
short circuit शेतात लोंबकळणाऱ्या विद्युतवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत ब्राम्हणगाव शिवारातील अल्पभूधारक शेतकèयाचा एक एकर ऊस जळून भस्मसात झाल्याची घटना शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली.
ब्राम्हणगाव येथील शेतकरी कल्याण देवबा देऊलवाड यांची ब्राम्हणगाव शिवारात 2.26 हेक्टर शेतजमीन असून त्यात चालू हंगामात त्यांनी 1 एकर ऊसाची लागवड केली आहे. याच शेतात लोंबकळणाèया विद्युतवाहक तारांचे घर्षण होऊन शुक्रवारी दुपारी आग लागली व ऐन दुष्काळात तळहाताच्या फोडाप्रमाणे अहोरात्र जपलेला 1 एकर ऊस जळून भस्मसात झाला.
त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी कल्याण देऊलवाड यांचे वीज वितरणच्या बेपर्वाईमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ग्राममहसूल अधिकारी गजानन चव्हाण यांनी घटनास्थळ पंचनामा केला आहे.
साखरा वीज उपकेंद्रांतर्गत महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे परिसरात शॉर्ट सर्किटमुळे शेतकèयांच्या शेतातील उसाला आगी लागण्याच्या घटना घडत आहेत.short circuit शासनाने वीज कंपनीच्या नियंत्रित कारभाराला लगाम लावून नुकसानग्रस्त शेतकèयांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.