दोन दिवसाच्या दाट धुयाने शेतकर्‍यांची चिंता वाढवली

तुरीला फुलगळ तर रब्बी पिकांना रोगराईचा धोका

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
कारंजा लाड,
increased-farmers-concerns कारंजा तालुयात गेल्या दोन दिवसापासून निर्माण झालेल्या दाट धुयामुळे शेती पिकावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि काही भागात झालेल्या रिमझिम पावसानंतर रविवारी पहाटे संपूर्ण तालुयाला दाट धुयाने अक्षरशः कवेत घेतले. सकाळी उशिरापर्यंत धुयाची तीव्रता कायम होती. अनेक ठिकाणी अवघ्या दहा ते पंधरा फुटांवरील वस्तूही स्पष्ट दिसत नव्हत्या. या बदलत्या हवामानामुळे एकीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना दुसरीकडे शेतशिवारातील पिकांवर संकटाचे ढग जमा झाले आहेत. विशेषतः तूर पिकातील फुलगळ, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आणि रब्बी पिकांच्या वाढीवर होणार्‍या संभाव्य परिणामामुळे शेतकरी धास्तावले आहेत.यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीपासूनच शेतकर्‍यासाठी आव्हानात्मक ठरला आहे.
 
 
increased-farmers-concerns
 
पावसातील अनियमितता, पावसाचे लांबलेले खंड, काही भागांत झालेला अल्प पाऊस आणि त्यानंतर बदलणारे हवामान अशा अनेक संकटांचा सामना करीत शेतकर्‍यांनी पिके जगविली. आता तूर पीक फुलोर्‍याच्या आणि शेंगा धरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असतानाच दाट धुके आणि ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या तालुयातील अनेक शेतामध्ये तूर पीक फुलोर्‍यात असून, काही ठिकाणी शेंगा धरण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी गहू आणि हरभरा अशा पिकांची पेरणी करण्यात आली. अशा वेळी सतत धुके, वातावरणातील वाढलेली आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शयता आहे. पानावर आणि फुलावर दीर्घकाळ ओलावा टिकून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसेच फुलाची गळ होणे, फुलाचे फलधारणेत रूपांतर कमी होणे आणि शेंगाची संख्या घटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तूर हे कारंजा तालुयातील महत्त्वाचे नगदी पीक असून अनेक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित या पिकाच्या उत्पादनावर अवलंबून आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अशातच धुयाचे वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
 
केवळ तूरच नव्हे, तर रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा आणि इतर पिकांच्या बाबतीतही शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. अनेक भागांत रब्बी पिकांची पेरणी व वाढीची प्रक्रिया सुरू आहे. या अवस्थेत सतत दाट धुके आणि सूर्यप्रकाशाचा अभाव राहिल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः हरभरा पिकावर आर्द्र हवामानामुळे मर, मुळकूज आणि इतर बुरशीजन्य रोगाचा धोका वाढू शकतो. कांदा पिकातही पानांवरील ओलावा दीर्घकाळ टिकल्यास करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शयता नाकारता येत नाही.गहू पिकाच्या वाढीसाठी योग्य तापमान आणि सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो. सतत ढगाळ वातावरणामुळे प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शयता असते. त्यामुळे आगामी काळात हवामान कसे राहते, यावर रब्बी पिकांची स्थिती अवलंबून राहणार आहे. हे वातावरण दीर्घकाळ कायम राहिल्यास पिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.