नवऱ्याच्या संशयास्पद वागण्याने पत्नीने लावले CCTV; फुटेजने उडाली खळबळ!

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
अहमदाबाद,
ahmedabad-wife-cctv-husband-affairनवरा वारंवार काही ना काही कारण सांगून बायकोला माहेरी पाठवायचा. सुरुवातीला तिने याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र, पतीच्या वागण्यामुळे तिच्या मनात संशय निर्माण झाला. अखेर नवरा आपल्या अनुपस्थितीत घरात नेमकं काय करतो, हे जाणून घेण्यासाठी तिने घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यानंतर फुटेजमध्ये जे दिसलं, ते पाहून तिला मोठा धक्का बसला. पत्नी माहेरी गेल्यानंतर पती दुसऱ्या महिलेला घरात घेऊन येत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा तिने केला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे हा प्रकार घडला असून, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 

ahemdabaad 
समोर आलेल्या माहितीनुसार, दरियापूर परिसरातील २७ वर्षीय महिलेचा २०१७ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. पती आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.
२०२० मध्ये या दाम्पत्याला मुलगा झाला. त्यानंतरही पतीने कोणतंही कारण नसताना दोन ते तीन वेळा मारहाण केल्याचं महिलेचं म्हणणं आहे. याच काळात पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा संशय तिला आला. सततच्या वादांना कंटाळून ती मुलाला घेऊन माहेरी गेली आणि न्यायालयात धाव घेतली. मात्र, नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघांमध्ये तडजोड झाली. त्यानंतर महिलेने न्यायालयातील अर्ज मागे घेतला आणि पतीसोबत पुन्हा राहण्याचा निर्णय घेतला.
नवरा वारंवार माहेरी का पाठवतो? पत्नीला आला संशय
तडजोडीनंतर दाम्पत्याने अहमदाबादच्या सरसपूर परिसरात घर खरेदी केलं. दोघांनी तिथे पुन्हा संसार सुरू केला. मात्र, त्यांच्यातील वाद काही थांबले नाहीत. महिलेच्या आरोपानुसार, पती वेगवेगळी कारणं सांगून तिला वारंवार माहेरी पाठवत होता. काही वेळा तिला सरसपूरच्या घरात राहूही देत नव्हता. त्यामुळे पती आपल्याला सतत घरापासून दूर का ठेवतो, असा प्रश्न तिला पडू लागला. पतीच्या हालचालींबाबत तिचा संशय अधिकच बळावला.